news
stringlengths 344
19.5k
| class
int64 0
2
|
---|---|
फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांपर्यंत मर्यादित राहिला नसून धूम्रपान न करणाऱ्या अनेक युवकांना हा कर्करोग होत आहे . वाढते वायू प्रदूषण याला कारणीभूत असू शकते , असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . सर गंगा राम रुग्णालय येथील डॉक्टरांनी मार्च २०१२ ते जून २०१८ या काळात १५० रुग्णांचा अभ्यास केला . या वेळी जवळपास ५० टक्के रुग्ण हे धूम्रपान न करणारे होते . ५० वर्षांखालील रुग्णांमध्ये हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत वाढला . यातील पाच रुग्ण २० ते ३० या वयोगटातील होते . मात्र त्यातील कोणीही धूम्रपान करीत नव्हते , असे गंगाराम रुग्णालयातील फुप्फुस शल्यविशारद अरविंद कुमार यांनी सांगितले . कमी वयाच्या आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण धक्कादायक असल्याचे कुमार यांनी सांगितले . धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होत असल्याचे सर्वज्ञात आहे , परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून येत आहे . १५० पैकी ११९ रुग्ण हे पुरुष होते आणि ३१ महिला होत्या . महिला रुग्णांमधील निम्म्याहून अधिक महिला या दिल्ली - एनसीआर भागातील होत्या . २० ते ८० या वयोगटातील रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला . हे रुग्ण उत्तर प्रदेश , बिहार , उत्तराखंड , राजस्थान , हरयाणा , पंजाब , हिमाचल प्रदेश , जम्मू आणि काश्मीर या भागांतील होते . रुग्णांचे सरासरी वय हे ५८ होते . यातील ७४ रुग्ण हे धूम्रपान न करणारे होते , तर ७६ धूम्रपान करणारे होते . | 1 |
रोजच्या आहारातील पदार्थात दालचिनीचा समावेश केला तर शरीराचे तापमान दोन अंशांनी कमी होऊ शकते व त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होते , असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे . याबाबत डुकरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की , दालचिनीमुळे त्यांच्या पोटातील थर व्यवस्थित राहतात , अशी माहिती ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे प्रकल्प संचालक कोरोश झदेह यांनी दिली . कक्ष तापमानाला डुकरांना दालचिनीयुक्त आहार दिला असता त्यांच्या पोटात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले . तसेच गॅस्ट्रिक अॅसिड व पेप्सिन कमी झाले . त्यामुळे त्यांचे पोट थंड झाले . जेव्हा डुकरांच्या शरीराचे तापमान जास्त असते तेव्हा त्यांच्या शरीरात कार्बन डाय ऑक्साइड कमी होतो . दालचिनीने तो आणखी कमी होतो , पण त्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसते . दालचिनीमुळे पोटाचे तापमान दोन अंश सेल्सियसने कमी होते . उष्ण कटिबंधातील लोक थंडाव्यासाठी दालचिनीचा वापर करतात , असे या विद्यापीठाचे डॉ . जियना झेन व नरेश पिल्ले यांनी म्हटले आहे . पचनानंतर पोटात वायू तयार होतात व त्यांच्या प्रमाणावर आतडय़ाचे आरोग्य अवलंबून असते . या प्रयोगात वायू संवेदक कॅप्सूल डुकरांच्या शरीरात सोडण्यात आल्या होत्या . पोटाच्या विकारांचे निदानही अशा कॅप्सूलच्या मदतीने करता येते . ( टीप : ‘ आरोग्यवार्ता ’ मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘ लोकसत्ता ’ चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . ) | 1 |
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ( आयओए ) चेन्नईत झालेल्या वार्षिक बैठकीत सुरेश कलमाडी व अभयसिंह चौटाला यांची अनुक्रमे तहहयात आश्रयदाते आणि अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा निर्णय झालाच नसल्याचे , आयओएचे अध्यक्ष एन . रामचंद्रन यांनी सांगितले . सुरेश कलमाडी यांच्यावर 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत . त्या वेळी कलमाडी भारतीय ऑलिंपिक संघटना आणि राष्ट्रकुल संयोजन समितीचे अध्यक्ष होते . याच भ्रष्टाचार प्रकरणात कलमाडी यांना 2014 मध्ये अटकदेखील करण्यात आली होती . यानंतरही 2015 मध्ये त्यांना ऍथलेटिक्समध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आशियाई ऍथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षीय पदकाने गौरविण्यात आले होते . त्याचबरोबर अभयसिंह चौटाला यांच्या अध्यक्षाच्या निवडीस आक्षेप घेत भारतीय ऑलिंपिक संघटनेस निलंबित करण्यात आले होते . मात्र , घटनाबदल झाल्यावर त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते . सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची नियुक्ती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अंगलट आली होती . केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावताना या जोडगोळीला हटवत नाही तोपर्यंत सर्व संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला . कलमाडी व चौटाला यांनी ही वेळ योग्य नसल्याचे कारण देत हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता . आता रामचंद्रन यांनीही चेन्नईतील बैठकीत असा काही प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे म्हटले आहे . | 2 |
मिताली व स्मृती यांची अर्धशतके ; मालिकेत २ - ० अशी आघाडी मिताली राज व स्मृती मानधना या सलामीच्या फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारी केली . त्यामुळेच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी - २० सामना नऊ विकेट राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २ - ० अशी आघाडी घेतली . प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १४२ धावा केल्या . त्यामध्ये सून लूस ( ३३ ) व नेदिनी डी क्लर्क ( २६ ) या दोनच खेळाडू फलंदाजीत चमक दाखवू शकल्या . भारताकडून अनुजा पाटील व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले . मिताली व स्मृती यांनी सलामीसाठी १०६ धावांची खणखणीत भागीदारी करीत भारताचा विजय दृष्टिपथात आणला . मितालीने त्यानंतर कर्णधार हरमानप्रीत कौरच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले . भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले . हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखून धरले . लूस व क्लर्क यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या ४३ धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता आफ्रिकेकडून अन्य मोठी भागीदारी झाली नाही . पाटील व यादव यांना पूजा वस्त्रकार व शिखा पांडे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद करीत चांगली साथ दिली . मिताली व स्मृती यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत भारताच्या विजयाचा पाया रचला . स्मृतीने चार चौकार व तीन षटकारांसह ५७ धावा केल्या . मोसेलीन डॅनियलने तिला बाद करीत ही जोडी फोडली . मितालीने ६१ चेंडूंत नाबाद ७६ धावा करताना आठ चौकार मारले . संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ७ बाद १४२ ( सून लूस ३३ , नेदिनी डी क्लर्क २६ ; अनुजा पाटील २ / ३७ , पूनम यादव २ / १८ ) पराभूत वि . भारत : १९ . १ षटकांत १ बाद १४४ ( मिताली राज नाबाद ७६ , स्मृती मानधना ५७ ) | 2 |
क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमानपदाचा निर्णय मतदानाशिवाय घेण्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला यश आले . पॅरिस आणि लॉस एंजलिस या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सामजंस्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता ऑलिंपिक २०२४ पॅरिस , तर २०२८ मध्ये लॉस एंजलिसला होईल . पॅरिस आणि लॉस एंजलिस या दोन्ही शहरांनी २०२४च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी दर्शविली होती . गेल्यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या छाननीनंतरच ही दोन नावे शर्यतीत राहिली होती . त्या वेळी बोस्टन , हॅम्बुर्ग , रोम आणि बुडापेस्ट या शहरांनी वाढता खर्च आणि जनतेकडून असणारा विरोध लक्षात घेऊन यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती . यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी दोन्ही शहरांनी आपापसात चर्चा करून कुणी प्रथम ऑलिंपिकचे आयोजन करायचे याचा निर्णय घ्यावा , असे आवाहन ऑलिंपिक समितीने केले होते . यजमानपदासाठी संभाव्य मतदान आणि त्यानंतरचे मतभेद टाळण्यासाठी हा सगळा प्रयत्न होता . ऑलिंपिक समितीच्या या प्रयत्नांना अखेर यश आले . लॉस एंजलिसने २०२४च्या यजमानपदाचा हट्ट सोडून २०२८मध्ये आयोजन करण्याची तयारी दर्शविली आणि हा सगळा प्रश्न सुटला . आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे . दोन्ही शहरांनी घेतलेला हा समजूतीचा निर्णय आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत कार्यकारी समितीसमोर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल , असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी सांगितले . पॅरिस आणि लॉस एंजलिस वैयक्तिक जबाबदारीवर या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत . कारण , २०१८ मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक समितीने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे . | 2 |
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार लौकिक मिळवलेला महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत हे दोघेही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे वावरत आहेत . बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत याने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटात तो धोनीची भूमिका साकारल्यानंतर लोकप्रिय झाला आहे . या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा सुशांत राजपूत आणि महेंद्र सिंग धोनी चर्चेत आले होते . आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मोहालीमध्ये रंगलेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात सुशांत राजपूतने उपस्थिती लावल्याने दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत . ट्विटरवर सध्या # DhoniSushantOnField हा हॅश टॅग ट्रेंडिगमध्ये आला आहे . धोनीच्या आयुष्यावरील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि सुशांत प्रत्यक्षात सामन्यावेळी एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ आहे . त्यामुळे या भेटीची नेटीझन्सनी एका फिल्डवर दोघांचे दर्शन झाल्याची तुलना करताना दिसत आहेत . धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारताना धोनीचा हेलिकॉप्टर शॉटसाठी सुशांतने मेहनत घेतली होती . या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली . त्यामुळे धोनीच्या नावाने लोकप्रियता मिळविलेल्या सुशांतच्या उपस्थित न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार धोनी सुशांतला आपला हेलिकॉफ्टर शॉट दाखविणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल . धोनीने एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत १९३ षटकार ठोकले आहेत . आजच्या सामन्यात सुशांतच्या साक्षीने त्याने चित्रपटासारखी खेळी केली तर भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकाराचा विक्रम धोनी आपल्या नावे करु शकतो . भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक १९५ षटकार ठोकले आहेत . | 0 |
प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीने तिसऱ्या दिवशी नाट्यमय वळण घेतले . मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या . त्यामुळे कसोटी नाट्यमय वळणावर येऊन ठेपली आहे . १ बाद २९ वरून इंग्लंडचा पहिला डाव २२७ धावांत आटोपला . २१५ धावांच्या आघाडीनंतर मात्र कांगारूंची दिवसअखेर ४ बाद ५३ अशी घसरगुंडी उडाली . यानंतरही कांगारू २६८ धावांनी पुढे आहेत . इंग्लंडचा निम्मा संघ १०२ धावांत गारद झाला होता . त्यानंतर यष्टिरक्षक - फलंदाज जॉनी बेअरस्टॉ तसेच वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रतिकार केला . बेअरस्टॉ - वोक्स यांनी ६६ धावांची भागीदारी रचली . नवव्या क्रमांकावर उतरलेला ओव्हर्टन ४१ धावांवर नाबाद राहिला . त्याची कामगिरी इंग्लंडसाठी डावात सर्वोत्तम ठरली . लायनने चार विकेटसह छाप पाडली . यात सर्वाधिक अनुभवी कूकच्या विकेटचा समावेश होता . इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक मारा केला . अँडरसनने सलामीवीर कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट ( ४ ) आणि ख्वाजा हे दोन मोहरे टिपले . वोक्सने वॉर्नर आणि स्मिथ ( ६ ) यांचा अडथळा दूर केला . दिवसअखेर हॅंडसकाँब ( ३ ) आणि नाईटवॉचमन लायन ( ३ ) नाबाद होते . संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया ८ बाद ४४२ घोषित व ४ बाद ५३ ( डेव्हिड वॉर्नर १४ , उस्मान ख्वाजा २० , जेम्स अँडरसन २ - १६ , ख्रिस वोक्स २ - १३ ) विरुद्ध इंग्लंड ः ७६ . १ षटकांत सर्वबाद २२७ ( ३७ , मोईन अली २५ , जॉन बेअरस्टॉ २१ , ख्रिस वोक्स ३६ , क्रेग ओव्हर्टन नाबाद ४१ - ७९ चेंडू , ५ चौकार , मिचेल स्टार्क ३ - ४९ , पीटर कमिन्स २ - ४७ , नेथन लायन ४ - ६० ) . | 2 |
डार्क सर्कलची समस्या आपल्यातील अनेकांना सतावते . कधी जागरण झाल्याने तर कधी शरीराला आहारातून योग्य ते घटक न मिळाल्याने ही समस्या उद्भवते . मात्र त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते . अन्यथा ही सर्कल्स जास्त वाढत जातात . कधी ही सर्कल दिसून नयेत म्हणून सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो तर कधी आणखी काही उपचार केले जातात . मात्र आहारात योग्य ती फळे आणि भाज्यांचा समावेश केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते . पाहूयात अशी कोणती फळे आहेत ज्याच्या सेवनाने डार्क सर्कल कमी होतील आणि तुम्ही जास्त चांगले दिसू शकाल… टोमॅटो टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हीटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते . हे घटक त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरतात . टोमॅटोमुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते आणि डोळ्याखालील नाजूक स्कीन चांगली राहण्यासही मदत होते . टोमॅटोमधील घटक चेहऱ्याला टवटवी देण्यास उपयुक्त ठरतात . त्यामुळे टोमॅटोबरोबरच संत्री , पपई आणि ब्रोकोली यांसारखी व्हीटॅमिन सी ने युक्त असणारी फळे खाल्ल्यास चांगले . काकडी काकडी ही जवळपास सर्व सिझनमध्ये मिळणारी फळभाजी आहे . काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते असे आपण नेहमीच ऐकतो . डार्क सर्लची समस्या कमी होण्यासाठी काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवल्यास फायदा होतो . अनेकदा ताण आणि थकवा आल्यानेही डार्क सर्कल येतात . ती कमी होण्यासाठी काकडीचा उपयोग होतो . बदाम डोळे आणि त्याच्या खालील त्वचा चांगली राहण्यासाठी व्हीटॅमिन ई अतिशय उपयुक्त असते . त्वचेतील लवचिकता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एन्झाईम्सशी लढा देण्यासाठी ई व्हीटॅमिन उपयुक्त ठरतात . बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हीटॅमिन ई असल्याने त्याचा आरोग्याला मुख्यतः त्वचेला फायदा होतो . याबरोबरच आक्रोड , जर्दाळू , सूर्यफुलाच्या बिया हे अतिशय उपयुक्त ठरतात . हिरव्या भाज्या हिरव्या भाज्यांना आपल्या आहारात कायमच महत्त्वाचे स्थान आहे . या भाज्यांमधून शरीराला अनेक आवश्यक घटक मिळत असल्याने जास्तीत जास्त पालेभाज्या खाव्यात . यात ब्रोकोली , पालक यांसारख्या भाज्या खाव्यात . यामुळे के जीवनसत्त्व मिळते जे त्वचेसाठी चांगले असते . रक्ताभिसरण चांगले नसणे हे त्वचेच्या आणि डार्क सर्कलच्या समस्यांचे एक मुख्य कारण असते . त्यामुळे हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश ठेवावा . | 1 |
फॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं ही तरुणांसाठी क्रेझ असते . सध्या असे ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांना “फॅशन सेन्स” आहे असेही संबोधले जाते . आधुनिक काळानुसार ही फॅशन बदलत असते . प्रत्येकाची आवड , गरज आणि पैशांच्या स्वरूपाप्रमाणे फॅशनची व्याख्या बदलत जाते . कुठलाही ट्रेंड फॉलो करताना आपण बाजारात सुरु असलेल्या डिझाइन्सचा जास्तीत जास्त वापर करतो . या ट्रेंडमध्ये ओल्ड फॅशन किंवा फंकी लूक असं काही नसतं . सध्या तरुण पिढी सोशल मीडियाच्या साह्याने फॅशन ट्रेंड्स बद्दल अपडेट राहते . मागच्या ५ ते १० वर्षात फॅशनची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे . विशेष म्हणजे यात काही वर्षांपूर्वी ट्रेंडमध्ये असणारी फॅशन परत येत आहे . ६० च्या दशकात फ्लोरल प्रिंटची फॅशन तरुणांमध्ये ‘हिट’ ठरली होती आणि आता तीच फॅशन परत येताना दिसत आहे . फॅशन ब्रॅंड्समध्ये सर्वात अव्व्ल असलेल्या ‘लिवा’ने हीच स्टाईल खास फॅशनप्रेमींसाठी नव्या रूपात आणली आहे . पाहूयात कशा आहेत या नवीन डिझाईन्स… गडद रंगसंगती : फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते , ६० च्या दशकांमधील हाच लूक सर्वात आकर्षक ठरत आहे . सध्या पिवळा , ऑफ व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स फॅशन इन आहेत . निवड : कपडे घेताना आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टी यानुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे . या फ्लोरल प्रिंटमध्ये काहीसा ‘रेट्रो’ टच असल्याने आपण त्या काळातील फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आणू शकता . मल्टिपल आऊटफिट्स : पूर्वी फक्त ‘वन पीस’ फ्रॉकपेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती . अशाचप्रकारे फिकट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट वेगळाच स्टायलिश लूक देऊन जातो . वेगवेगळ्या प्रिंट्सचे एकत्रीकरण : ६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स , चेक्स आणि रेषांचे प्रिंट्ससुद्धा चर्चेत होते . आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे . पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ऑकेजनला अशा प्रिंटचे कपडे आकर्षक दिसतात . | 1 |
इंग्लिश येणं ही आता एक अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे . पूर्वी फक्त पेपरा - पुस्तकात असणाऱ्या इंग्लिश भाषेने स्मार्चटफोन युगात आपल्या रोजच्या जीवनाचा ताबा कधी घेतला हे कळलंच नाही . अर्थात मातृभाषा शिकण्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही . पण त्याजोडीला इंग्लिश येत नसेल तर काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते . नोकरीसाठी अर्ज करताना तर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं . तुमच्या बायोडेटामध्ये असणारी इंग्लिश ग्रामरची एखादी चूक किंवा एखादा स्पेलिंग एरर तुमचं इंप्रेशन खराब करू शकतो . कितीतरी इंग्लिश शब्दांचा उच्चार आणि त्यांचं स्पेलिंग जवळजवळ सारखंच असतं पण त्यांच्या अर्थांमध्ये फरक असतो . अशी गडबड टाळायची असेल तर पुढच्या काही शब्दांच्या जोड्या वाचा १ . Affect ( अफेक्ट ) आणि Effect ( इफेक्ट ) हे दोन शब्द एकसारखेच वाटले तरी ते वेगवेगेळे आहेत . ‘Affect’चा अर्थ परिणाम करणं तर Effect चा अर्थ परिणाम होणं २ . it’s आणि its या दोन्ही शब्दांमध्ये नेहमी गल्लत केली जाते अनेकदा सगळ्यांना वाटतं की हे दोन्ही शब्द एकच आहेत . पण तसं न होता या दोन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत . it’s हा शब्द ‘it is’ चं छोटं रूप म्हणून वापरला जातो तर its हा शब्द ‘त्याचा / त्याची / त्याचे’ अशा अर्थाने वापरतात . उदा . ‘बाळ त्याच्या खेळण्यांशी खेळत आहे’ याचं भाषांतर करताना ‘The baby is playing with its toy’ असं लिहितात . तर ‘आज पाऊस पडतोय’ या वाक्याचं भाषांतर करताना ‘It’s raining today’ असं लिहिलं जाईल . दुसऱ्या वाक्यामधल्या it’s चा वापर it is अशा अर्थाने केला गेला आहे . ३ . Expect / except / accept या शब्दांचे उच्चार जवळचे असल्याने त्यांच्यामध्ये गोंधळ होणं साहजिक आहे . Expect ( एक्सपेक्ट ) म्हणजे ‘अपेक्षा करणे’ , Accept ( अॅक्सेप्ट ) म्हणजे ‘स्वीकार करणे’ आणि Except ( एक्सेप्ट ) म्हणजे ‘…च्याशिवाय’ ४ . Breath / Breathe ‘Breath’ म्हणजे श्वास . हे नाम आहे . तर श्वास घेण्याच्या प्रत्यक्ष क्रियेला ‘Breathe’ किंवा ‘Breathing’ म्हणतात . ५ . Principal / Principle Principal म्हणजे मुख्याध्यापक तर Principle म्हणजे तत्व . न्यूटनचा सिध्दांत याचं इंग्लिश भाषांतर Newton’s Principle असं होतं . फिरले का डोळे ? अशा अजून ३० आणखी जोड्या देता येतील . ‘English is a very funny language’ असं म्हटलं जातं ते खरंच आहे . पण काही मोजक्या बारीक गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही भाषा आत्मसात करणं कठीण नाही . | 1 |
खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या नवव्या सिझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे . यामध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना पाहायला मिळतात . या स्टंटदरम्यान आदित्य नारायण आणि विकास गुप्ता हे स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत . एका स्टंटदरम्यान आदित्यच्या डोळ्याला इजा झाली . तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे . तर दुसऱ्या एका स्टंटदरम्यान विकास गुप्ताला साप चावला . त्याला काही इंजेक्शन्स दिले असून बरा होण्यास काही दिवस लागणार असल्याचं कळतंय . Fanney Khan Review : स्वप्नपूर्तीचा वेध घेणारा ‘फन्ने खान’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी खरंतर प्रत्येक स्टंट स्पर्धकांना करण्यास सांगण्यापूर्वी शोच्या टीमकडून सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जाते . या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी स्वतः सुरक्षेबाबत खातरजमा करून घेत असतो . तसंच पहिल्यांदाच अशा प्रकारच्या घटना घडल्याचं शोच्या टीमकडून म्हटलं जात आहे . या घटनांमुळे रोहितनेही सेटवर राग व्यक्त केला . स्पर्धकांच्या सुरक्षेची अधिक काळजी यापुढे घेतली जाईल अशी ग्वाही टीमकडून देण्यात आली आहे . | 0 |
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत . हल्ली वेडिंग फोटोग्राफी , प्री वेडिंग , पोस्ट वेडिंग असे नवनवे ट्रेंड सुरू झाले आहेत . पण फोटोग्राफीबरोबरच लग्नाच्या अल्मबबाबतही ग्राहकांनी सजक असायला हवं . अनेक जोडप्यांना वेडिंग अल्बमसाठी पैसे खर्च करणं म्हणजे मोठी खर्चिक बाब वाटते . ‘कशाला खर्च करायचे एवढे पैसे ? नाहीतरी अल्बम नंतर पडूनच राहणार आहे त्यापेक्षा दुसरीकडे पैसे खर्च करा” असे डायलॉग सर्रास कानावर पडतात . पण लग्न झाल्यावर जेव्हा हाच अल्बम कित्येक वर्षांनी आपण उघडून पाहतो तेव्हा ते अनमोल क्षण पुन्हा जगताना किती आनंद मिळतो , हा आनंद पैशांत मोजता न येण्यासारखाच आहे . आपण लग्नासाठी कित्येक वायफळ गोष्टींवर खर्च करतो पण आठवणी जपून ठेवण्यासाठी थोडे अधिक पैसे खर्च केले तर ? ही कल्पना नक्कीच चांगली असेल . आता हा वेडिंग अल्बम निवडायचा कसा ? हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासमोर असेल म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणलाय हा खास व्हिडिओ ज्याच्या मदतीनं वेडिंग अल्बम कसा निवडायचा ? त्यासाठी किती पैसे खर्च करायचे ? कोणत्या प्रकारचा अल्बम दीर्घकाळ टिकतो ? यासारख्या तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पाहा आणि हो तुमच्या ओळखीच्या मित्र मैत्रिणींचं लग्न होत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका ! | 1 |
शुक्रवारी समिट अटेंप्टला रवाना व्हायचे असल्यामुळे वेगळाच उत्साह होता . मध्यरात्री दीड वाजता निघायचे ठरले होते . त्यामुळे त्याआधी मी आणि विशाल कडुसकरने दोन - तीन तास विश्रांती घेतली . आम्ही टेंटमध्ये पाठ टेकली . आमच्या कुकने १२ . ३० वाजता नाष्टा तयार ठेवेन असे कळविले होते . त्यामुळे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उठलो . निघण्यापूर्वी बेस कँपवरील आमच्या टेंटमधील मंदीरात पुजा केली . त्यानंतर गणपती , स्वामी समर्थ , शंकर , देवी , दत्त यांची आरती केली . त्यानंतर उपमा आणि चहा घेतला . कुकने आम्हाला पॅक लँच दिले होते . त्यात उकडलेली अंडी आणि बटाट्याची भाजी होती . याशिवाय आमच्याजवळ चिक्की , ड्राय फ्रुट्स आणि चॉकलेट होती . निघण्यापूर्वी पुण्यातील काही जणांशी संपर्क साधला . आमच्या सॅक आधीच भरून तयार ठेवल्या होत्या . त्या घेऊन रवाना झालो . मध्यरात्री निघाल्यनंतर खुंबू आईसफॉल क्रॉस करायला आम्हाला साधारण साडेचार तास लागले . यानंतर आम्हाला कँप १ ऊन पडायच्या आत क्रॉस करायचा होता . वरच्या कँपला पहाटे साडे पाच - सहाच्या सुमारासच ऊन पडते . ऊन पडल्यानंतर बर्फ वितळू लागतो . त्यामुळे हिमनग किंवा हिमकडे कोसळण्याची शक्यता असते . मुख्य म्हणजे मार्गात लावलेल्या शिड्या , अँकर्स यांची पोझीशन सुद्धा हालते . आमची चढाई अगदी नियोजनानुसार झाली . आम्ही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कँप १ला पोचलो . त्यानंतर आम्ही तेथे थोडा वेळ थांबलो . आम्ही अर्धा तास थांबलो . तेथे उपमा खाल्ला . आणखी अर्धा तास विश्रांती घेतली . मग पुढील चढाई सुरु केली . कँप २ला दुपारी १२ पर्यंत पोचायचे नियोजन होते . कँप १ ते कँप २ या मार्गात सपाट जागा आहे . चढाई नसली तरी हा टप्पा सोपा नक्कीच नाही . कँप १ ची उंची ५९०० , तर कँप २ ची उंची ६३०० - ६४०० मीटरपर्यंत आहे . तुम्ही कँप २ ला तुमचा टेंट कुठे लावता यानुसार ही उंची बदलते . कँप १ला तुम्ही पोचता आणि कँप २च्या दिशेने नजर टाकता तेव्हा तो आय - लेव्हलला वाटतो . याचा अर्थ हे अंतर सपाटच आहे असे वाटते . तांत्रिक चढाई नाही म्हणून हा मार्ग सोपा नक्कीच नसतो , हे मला आवर्जून सांगावेसे वाटते . चालायला सुरवात केल्यानंतर पहिल्या काही पावलांमध्येच ते तुमच्या लक्षात येते . तुम्ही अॅक्लमटाईज कसे झाला आहात यावर सगळी आगेकूच अवलंबून असते . जो कुणी या भागात जाऊन आला आहे त्यालाच या मार्गाची कल्पना येईल . तरी सुद्धा मी शब्दांत शक्य तेवढे वर्णन करायचा प्रयत्न करतो . कँप १ ते कँप २ यातील भागास वेस्टर्न कुम असे संबोधले जाते . डावीकडे एव्हरेस्टचा पश्चिम भाग ( वेस्ट शोल्डर ) , समोर ल्होत्से आणि उजवीकडे नुप्स्ते अशी तीन शिखरे आहेत . मध्ये ही जागा आहे . त्यात अनेक ठिकाणी क्रीव्हास म्हणजे हिमभेगा आहेत . खुंबू आईसफॉल आणि या मार्गातील हिमभेगांमध्ये फरक आहे . खुंबूत तुम्हाला बऱ्याचदा हिमभेगांची खोली दिसू शकते . इथे मात्र तसे नसते . याचे कारण या हिमभेगा फार खोल आहेत . नुसत्या डोळ्यांनी तुम्हाला दीड - दोनशे फूट खोलीचा अंदाज येऊ शकतो . कँप १ ते कँप २ या भागात बऱ्याच ठिकाणी रोप फिक्स झालेला नसतो . रुट ओपनिंग झाले म्हणजे शंभर टक्के रोप - फिक्सींग झाला असे होत नाही . ज्या भागात जास्तच हिमभेगा आहेत , तेथे रोप लावतात . इतर ठिकाणी तो नसतो . त्यामुळे अगदी ५० मीटर अंतर सुद्धा इकडे - तिकडे करून चालत नाही . याचे कारण अनेक हिमभेगा बर्फाखाली दडलेल्या असतात . त्यात हिडन क्रीव्हासेस असे संबोधले जाते . वरून त्यांचा अंदाज येत नाही . हा भाग तिन्ही बाजूंनी पर्वतांनी वेढलेला असल्यामुळे ढग आले किंवा वारा वाहू लागला तर लगेच तापमान खाली येते . हेच हवा कमी असल्यामुळे तेथे उष्णता सुद्धा निर्माण झालेली असते . गिर्यारोहकांच्या भाषेत तेथील वातावरण सोलर कुकरसारखे असते . २०१२ मधील मोहीमेच्यावेळी अॅक्लमटाईज होताना याच भागात नुप्त्सेवरून हिमकडा कोसळला होता . अलिकडे इतका मोठा हिमप्रपात झाल्याचे ऐकले नाही . या भागाचे आणखी एक आव्हान म्हणजे अंतिम चढाईच्यावेळी तुम्ही कँप १ ते कँप २ हा टप्पा थेट पूर्ण करता . यास डायरेक्ट मुव्हमेंट असे संबोधले जाते . अंतिम चढाईच्यावेळी कँप २ हा बेस कँपसारखा वापरला जातो . बेस कँप ते कँप २ ही चढाई साधारण बारा तासांची असते . कँप २ चे लोकेशन खडकाळ ( रॉकी ) असते . आम्ही घालतो ते बूट आणि क्रम्पॉन्स हे बर्फाळ भागासाठी अनुकूल असतात . त्यामुळे खडकाळ भाग येतो तेव्हा जपून चालावे लागते . आम्ही बेस कँप ते कँप 2 हे अंतर दहा तासांत पोचलो . माझ्याबरोबर दोर्ची शेर्पा , तर विशालबरोबर लाक्पा नोर्बू हा शेर्पा आहे . ( क्रमशः ) | 2 |
नाटक हे प्रेक्षकांचे मनोरंजन जरी करत असलं तरी ते मनोरंजन करणारे कलाकारही शेवटी माणूस असतात . त्यांनाही भावना असतात . पण कधी कधी कठीण प्रसंगातही ते फक्त नाटकाच्या प्रेमासाठी कसे सारं काही विसरुन जातात याचाच एक अनुभव सांगितलाय अभिनेता सुयश टिळक याने . . कोल्हापुरला आमचा स्ट्रॉबेरीचा प्रयोग होता . त्या दिवशी आम्ही गोव्यावरुन कोल्हापुरला जाणार होतो . मी माझी गाडी घेऊन पुढे आलेलो तर बाकीचे कलाकार मागच्या गाडीने येत होते . मी गोव्यावरुन थोडा लवकर निघालो होतो त्यामुळे मी कोल्हापुरला आधीच पोहोचलो . पण मागच्या गाडीला यायला वेळ लागल्यामुळे प्रयोग सुरु करायला आम्हाला अर्धा तास उशिर होणार होता . प्रेक्षकांनीही सहकार्य केले . तेही तेवढा वेळ थांबून होते . थोड्या वेळाने प्रयोग सुरुही झाला , प्रयोग रंगात असताना अचानक स्पॉटची काच तडकली आणि ती काच सरळ खाली पडली . खाली सतरंजी असल्यामुळे आणि काच गरम असल्यामुळे आग लागते का अशी भीती मला वाटत होती . ती काच फार गरम होती , पण त्याने आग लागू नये या भीतीने मी ती काच उचलली आणि विंगेत फेकली . त्यामुळे माझा हात फार भाजला होता . त्यावेळी मी आणि सुरुची दोघंच सेटवर होतो . आम्ही प्रयोग न थांबवता तो तसाच सुरु ठेवला होता पण मला आतून फार दुखत होतं . गरम काच उचलल्यामुळे माझी बोटं सुजली होती . सुरुचीने तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पटकन पाण्याचा पेला आणला आणि त्यात मी माझी बोटं बुडवून तो प्रयोग न थांबवता पूर्ण केला होता . तर दुसरीकडे महाडला प्रयोग सुरु करण्याच्या काही मिनिटं आधी मला अश्विनी एकबोटे यांचे निधन झाल्याची बातमी कळली होती . तिच्या अचानक जाण्यामुळे मी फारच हादरलो होतो . मी ढसाढसा रडत होतो . मी तो प्रयोग करु शकेन की नाही हेही मला माहित नव्हते . प्रयोग सुरु असतानाही मला काही आठवत नव्हतं , त्यामुळे प्रयोग पूर्ण होईल की नाही हेही मला कळत नव्हते . अनेकदा असेही झाले होते की मला पुढची वाक्य आठवत नव्हती . तेव्हा सुरुची सांभाळून घेत होती . तो प्रयोग जेव्हा संपला तेव्हा मी रुममध्ये जाऊन फार रडलो . मी नंतर प्रयोगामध्ये केलेल्या चुकांबद्दल प्रत्येकाची माफीही मागितली . पण प्रेक्षकांना त्या दिवशीचा प्रयोग फार आवडला होता . या प्रसंगातून मला असा अनुभव मिळाला की , एकदा का तुम्ही रंगमंचावर गेलात की ते एक वेगळंच जग असतं . तो रंगमंच तुम्हाला खूप काही शिकवत असतो . शब्दांकन - मधुरा नेरूरकर madhura . nerurkar @ indianexpress . com | 0 |
फेसबुक आपल्या आयुष्याचा जणू एक भागच बनला आहे . काहिंची दिवसाची सुरुवात फेसबुकच्या दर्शनाने होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . सोशल मीडिया फ्रेंडली एखादा व्यक्ती दिवसातून किमान दहावेळा तरी फेसबुकवर लॉगिन करतो . तर कित्येक जण असे असतात की ते दिवसातून जे जे काही करतील त्याच्या सगळ्या अपडेट्स फेसबुकवर टाकत असतात . नुकतेच एक संशोधन समोर आले आहे . यानुसार जर एखाद्याच्या पोस्टवर दिवसांतून त्या युजर्सच्या जवळच्या व्यक्तींकडून कमेंट आल्या तर त्यांच्या दैंनदिन जीवनात याचा खूप मोठा फरक पडू शकतो . जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीच्या दिवसातील दोन कमेंट देखील फेसबुक युजर्सच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो . हा फंडा गरोदर महिला आणि लग्न होणा - यांना जास्त लागू होऊ शकतो असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे . कारनेगी मेलान यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात हे समोर आले आहे . कंप्युटर मेडिटेड कम्युनिकेशनकडून या संशोधनासंबधिताच प्रबंध प्रकाशित करण्यात आला . जगभरातल्या ९१ देशातील जवळपास दोन हजार युजर्सना घेऊन काही संशोधन करण्यात आले आणि त्यांच्यावर जवळपास ३ महिने अभ्यास करण्यात आला त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला . गरोदर महिला किंवा नवीन लग्न ठरलेल्यांनी जर फेसबुकवर काही पोस्ट टाकली आणि त्यावर आवडत्या व्यक्तींकडून कमेंट आल्या तर साहजिक त्यांच्या चेह - यावर हसू येते . आपली आवडती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते किंवा आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे अशा युजर्सच्या मानसिकतेत हळूहळू सकारात्मक बदल होतात . हे बदल आपसूकच त्यांची चिडचिड , एकटेपणा , ताण दूर करतात . जर अशा जवळच्या व्यक्तींकडून दिवसांतून दोन कमेंट म्हणजे महिन्याला ६० कमेंट आल्या तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडलील असा निष्कर्ष यातून काढला आहे . पण याच बरोबर पोस्ट लाईक केल्याने मात्र फारसा काही फरक पडत नाही असेही यात सांगितले आहे . | 1 |
क्रोनिक फटिक सिंड्रोम किंवा गल्फ वॉर इलनेस या दोन शारीरिक व मानसिक ताणाशी निगडित रोग लक्षणसमूहांमध्ये मानसिक कारणे नसून मेंदूतील बदल कारणीभूत आहेत , असे नवीन संशोधनात दिसून आले आहे . आतापर्यंत हे दोन्ही लक्षण समूह हे निव्वळ मानसिक समजले जात होते ; पण ते मेंदूतील रेणूंच्या रचनेत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात असे आता दिसून आले आहे . या दोन्ही रोगांत झोप बिघडते , घसा धरतो , हातपाय व डोके दुखत राहते , व्यायामानंतर थकवा येतो , स्नायू सतत कसर लागल्याप्रमाणे दुखत राहतात , ताण जाणवतो तसेच बोधनशक्ती राहत नाही . नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असे म्हटले आहे , की क्रोनिक फटिक डिसॉर्डर हा मानसिक आजार नाही , त्यात रुग्णाच्या विचारांचा व मानसिकतेचा काही संबंध नसतो . या आजारावर अद्याप उपाय सापडलेला नाही व त्याची कारणेही माहिती नाहीत , पण आता मेंदूतील रेणवीय फरकांमुळे हा रोग होत असल्याचे सूचित होत आहे . त्यामुळे अमेरिकेतील ८३६००० ते २५ लाख लोकांसाठी आशेचा किरण आहे . भारतातही याचे अनेक रुग्ण असून या रोगाचे निदान करणे अवघड असते . आखाती युद्धातून परतलेल्या १७५००० लोकांच्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले , की मेंदूतील बदलांमुळे हा आजार होतो . जॉर्ज टाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ . जेम्स एन बरानिक यांनी सांगितले , की या दोन्ही रोगांतील लोकांचा रक्तद्रव तपासला असता त्यात फरक दिसून आला . स्थिर सायकल चालवणे व इतर व्यायामातून यात फायदा होऊ शकतो . मेंदूचा एमआरआय केला असता रोगात मेंदूत होणारे बदल दिसून येतात . फिजिओथेरपीचाही यात उपयोग होतो . व्यायामानंतर प्रथिनांचे नियंत्रण करणाऱ्या मायक्रोआरएनएचे प्रमाण बदलते , त्यामुळे हा रोग होतो . या रोगांमध्ये मेंदूत होणारे बदल हे अल्झायमर , डिमेन्शिया व नराश्यापेक्षा वेगळे असतात . | 1 |
माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांची सूचना भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी गमावणाऱ्या भारताने भविष्यात जागतिक दर्जाचे ड्रॅग - फ्लिकर्स घडवण्याची नितांत आवश्यकता आहे , अशी प्रतिक्रिया माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी रविवारी व्यक्त केली . विश्वचषक हॉकी स्पध्रेत यजमान भारताला उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून २ - १ असा पराभव पत्करावा लागला . रुपिंदर पाल सिंगच्या अनुपस्थितीत हरमनप्रीत सिंग , अमित रोहिदास व वरुण कुमार यांनी भारतासाठी ड्रॅग - फ्लिकर्सची भूमिका बजावली . मात्र त्यांना फक्त सरासरी ३० . ७ टक्क्यांपर्यंतच मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले . दक्षिण आफ्रिकेविरुद्धदेखील भारताला पाचपैकी तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले . भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना तिर्की म्हणाले , ‘‘आपल्याला अव्वल दर्जा असलेल्या ड्रॅग - फ्लिकर्सची गरज आहे . सध्या भारताच्या ताफ्यात हरमनप्रीत , अमित व वरुण हे तीन ड्रॅग - फ्लिकर्स असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे . महत्त्वाच्या सामन्यांत भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची सरासरी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उंचावली पाहिजे . ’’ ‘‘भारतीय संघातील अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या लैकिकास साजेसा खेळ केला नाही , असे मला वाटते . मात्र संघाची कामगिरी उत्तम होती . बचावफळीने विशेषतः सर्वाना प्रभावित केले , पण दुर्दैवाने उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडण्यात आपण अपयशी ठरलो . त्यामुळे माझ्या मते तरी आपण विश्वचषक गमावलाच , ’’ असेही तिर्की म्हणाले . याव्यतिरिक्त युवा खेळाडूंचा भरणा असूनदेखील बलाढय़ बेल्जियमला २ - २ असे बरोबरीत रोखणे भारतासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम क्षण होता , असे तिर्की यांनी नमूद केले . हरेंद्र सिंग हे सर्वोत्तम प्रशिक्षक ! तिर्की यांनी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या कामगिरीचीसुद्धा प्रशंसा केली असून ते भारताला लाभलेले सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत , असे तिर्की म्हणाले . ‘‘हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स करंडकात उपविजेतेपद मिळवले , तर विश्वचषकातदेखील समाधानकारक कामगिरी केली . हरेंद्र यांच्यामुळे प्रशिक्षणाचा स्तर उंचावला असून यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे , ’’ असे तिर्की म्हणाले . | 2 |
डेव्हिड वॉर्नरच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११७ धावांनी दणदणीत विजय मिळवला . या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश साकारले . नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला . मालिकेत भन्नाट सूर गवसलेल्या वॉर्नरने सहकारी नियमित अंतरात बाद होत असतानाही एकेरी , दुहेरी धावांबरोबरच चौकारांची लूट केली . अन्य फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी धडपडत असताना वॉर्नरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत खेळ केला . मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार खेचत वॉर्नरने एकदिवसीय प्रकारातील अकराव्या तर यंदाच्या कॅलेंडर वर्षांतील सातव्या शतकाची नोंद केली . एका कॅलेंडर वर्षांत एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची वॉर्नरने बरोबरी केली . मात्र यंदाच्या वर्षांतला ऑस्ट्रेलियाचा हा शेवटचा एकदिवसीय सामना असल्याने वॉर्नरला तेंडुलकरचा विक्रम मोडता येणार नाही . सलामीला येत संपूर्ण डाव खेळून काढण्याचा विक्रम नावावर करण्याची वॉर्नरला संधी होती . मात्र डावातील शेवटच्या चेंडूवर वॉर्नर धावचीत झाला . त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांसह १५६ धावांची मॅरेथॉन खेळी केली . वॉर्नरचा दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २६४ धावांचीच मजल मारता आली . न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने ३ बळी घेतले . प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जराही प्रतिकार न करता सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव १४७ धावांतच संपुष्टात आला . मार्टिन गप्तीलने सर्वाधिक ३४ धावा केल्या . ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले . या मालिकेत २९९ धावा करणाऱ्या वॉर्नरला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले . संक्षिप्त धावफलक | 2 |
आपल्या शरीराने आणि हृदयाने अपेक्षेप्रमाणे काम करावं असं वाटत असेल , तर त्याला चांगली झोप हवीच . दीर्घकाळ निद्रानाशाचा विकार असेल तर त्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी निगडीत विकार होण्याची शक्यता असल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे . आपलं झोपेचं चक्र टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं . हलक्या झोपेपासून गाढ झोपेपर्यंत आणि नंतर पुन्हा हलक्या झोपेकडे . आपलं शरीर गाढ झोपेच्या टप्प्यात शिरण्यासाठी स्वतःला सज्ज करतं , तेव्हा हृदयाची गती आणि रक्तदाब कमी होतो . याच काळात आपलं शरीर इंद्रियांना आवश्यक असलेली विश्रांती देऊन स्वतःला पुन्हा ताजंतवानं करतं . येणारा दिवस आपण चांगल्या पद्धतीने सक्रिय राहावे यासाठी रक्तदाब आणि हृदययाची गती कमी होणं आवश्यक असतं . मात्र गाढ झोपेच्या टप्यात झोपमोड झाली तर हृदयाच्या विश्रांतीचा काळ कमी होतो . पुरेशी झोप न मिळाल्यास निद्रेला तिच्या या महत्त्वाच्या टप्प्यांतून जाण्यासाठी वेळ मिळत नाही . यामुळे तुम्ही झोपेत असताना तुमच्या आरोग्याची नव्याने बांधणी करण्याचे काम सुरू असते त्यात बाधा येते . पुरेशी झोप झाली नाही तर शरीरात जळजळ वाढते . याची परिणती गंभीर स्वरूपाच्या हृदयाच्या तक्रारींमध्ये होऊ शकते . याशिवायही अनेक समस्या उद्भवतात . सतत झोप न मिळणे किंवा पुरेशी झोप न झाल्याने दिवसा तणावाचा सामना करावा लागतो , वाढत्या तणावाला प्रतिक्रिया देत राहिल्याने तसेच चिंतेमुळे शरीरात अतिरिक्त कार्टिसोल हार्मोनची निर्मिती होते . हा हार्मोन , तणावाचा हार्मोन म्हणूनही ओळखला जातो . तुम्हाला रात्री नीट झोप लागत नाही , तेव्हा तुम्हाला दिवसभर झोप येत राहते . अनेक दिवस झोप अपुरी राहिल्यास एक कायमची आळशी भावना मनात निर्माण होते आणि त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते . याउलट नियमित व्यायाम केल्याने कोलस्टेरॉलची पातळी कमी होते , रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो . काय उपाय कराल ? दिनक्रमाचे पालन कराः तुमच्या झोपेच्या वेळेनुसार वेळापत्रक निश्चित करा आणि त्याचे पालन करा . फोन , गॅझेट्स किंवा रात्री उशिराच्या टीव्ही मालिकांसारखी प्रलोभनं दूर ठेवा . वेळेवर आणि चांगल्या झोपेची सवय लावून घेण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करा . व्यायामः कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल शरीरासाठी चांगली , हे तर सर्वांना माहीत आहेच . कार्डिओ व्यायाम आठवड्यातून किमान चार वेळा किंवा एक दिवसाआड करा . जॉगिंग , पोहणे , सायकलिंग आणि साधे चालणे यांसारखे कार्डिओ व्यायाम तुमच्या हृदयाची गती वाढवून त्याचे कार्य चांगले राहण्याची काळजी घेतात . निद्रातज्ज्ञाचा सल्ला घ्याः एवढे करूनही तुम्हाला झोपेसंबंधीत अडचणी असतील आणि तुम्हाला हृदयविकाराचा धोका असल्याची काळजी सतावत असेल , तर निद्रातज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या . तुम्हाला रात्री नक्की कोणती गोष्ट जागं ठेवते हे कदाचित डॉक्टरांशी बोलल्याने समजू शकेल . डॉ . प्रीती देवनानी , स्लीप थेरपिस्ट , स्लीप @ 10 – आरोग्य जागरूकता उपक्रम | 1 |
१ . दूषित पाण्यापासून होणाऱ्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी , घातक जीवजंतू नाहीसे करण्यासाठी , १ लिटर पाण्यात ३ - ४ थेंब क्लोरीन घाला . २ . सरबत किंवा ताक करणार असाल तर त्यासाठी उकळलेलं पाणी वापरा . ३ . पावसाळ्यात पचनशक्ती कमी झाल्यामुळे काही जणांना दूध पचत नाही , त्यांनी ताक किंवा दही घ्यावं . दही बनताना दुधामधील लॅक्टोजचं लॅक्टीक अॅसिड बनतं , ते पचायलाही हलकं असतं . ४ . पचनाचा त्रास असणाऱ्यांनी कच्चे सालाड न खाता ते वाफवून घ्यावे . त्यामुळे पचायला सोपे तर होतेच पण पावसाळ्यामुळे भाज्यांमध्ये असणारे जंतू मरण्यासही मदत होते . ५ . कडधान्य शक्यतो दुपारच्या आत खावीत , रात्री टाळावीत . वाफवून घेतल्यास उत्तम . डाळींमध्ये मूग डाळ पचायला हलकी असते . ६ . आहार योग्य प्रमाणातच घ्या , पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नका . ७ . आवश्यक तेवढंच अन्न शिजवा . उरलेलं अन्न लवकर खराब होऊ शकतं . शिजवून ठेवलेलं खायची वेळ आली तर गरम करून , उकळवून घ्या . ८ . शिजलेले पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा , नाहीतर माशा बसून दूषित होतील . ९ . घराबाहेर खायची वेळ आली तर असं हॉटेल निवडा जिथे दर्जा , स्वच्छता पाळली जाते . बाहेरील पदार्थ स्वतःच्या नजरेसमोर शिजवलेले , उकळलेले किंवा परतलेले असावेत . पनीर काठी रोल साहित्य : गव्हाचं पीठ - दीड वाटी , ड्राय यीस्ट - १ चमचा , साखर - अर्धा चमचा , पनीर - दीड वाटी , कांदा - बारीक चिरून - अर्धी वाटी , सिमला मिरची - बारीक चिरून अर्धी वाटी , हिरवी मिरची - चिरून २ , लसूण - चिरून ४ पाकळ्या , कोथिंबीर - चिरून अर्धी वाटी , तेल - २ चमचे , मीठ - चवीनुसार . कृती : ४ चमचे कोमट पाण्यात , १ / २ चमचा साखर , १ / २ चमचा मीठ , यीस्ट घालून १५ - २० मिनिटे झाकून ठेवावे . नंतर कणकेमध्ये यीस्ट मिसळून भिजवून ठेवावे . दीड ते दोन तासांनी पीठ व्यवस्थित फुगेल . त्याच्या ५ पोळ्या , पातळसर लाटून भाजून घ्याव्यात . पनीरच स्टफींग करण्यासाठी पॅनमध्ये तेलात कांदा , हिरवी मिरची , परतून घ्यवी . गुलाबी रंग आल्यावर , सिमला मिरची परतून घ्यावी . लसूण घालावा . पनीर किसून / कुस्करून घ्यावं . तेही परतावं . २ - ३ मिनिटं परतून कडेने तेल सुटायला लागल्यावर मीठ घालावं . ढवळून gas बंद करून , कोथिंबीर घालून ढवळावं . काठी रोल सर्व्ह करताना , पोळीमध्ये पनीरचं स्टफींग भरून रोल करून मग सर्व्ह करावा . गार्निशिंग साठी सिमला मिरची आणि कांद्याच्या रिंग्स वापराव्यात . चटपटीतपणा वाढवायचा असेल तर , रोलमध्ये स्टफींग भरण्याआधी पुदिन्याची चटणी / टोमाटो सॉस पोळीला लावू शकता . * पावसाळ्खयात खमंग , पौष्टिक , चविष्ट लागणारे रोल कमीतकमी तेलात होत असल्याने आरोग्यदायीही असतात . * पनीर आणि भाज्यांमुळे प्रोटीन्स , व्हिटामिन , मिनरल्स मिळतात . यीस्ट मधून व्हिटामिन B 6 मिळतं . सुकेशा सातवळेकर , आहारतज्ज्ञ | 1 |
चेन्नई कसोटीत मोईन अलीचे दमदार शतक आणि जो रुटची ८८ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडचा डाव सावरला असून संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडला ४ बाद २८४ धावा केल्या आहेत . इंग्लंडकडून बेअरस्टो यानेही ४९ धावांचे योगदान दिले . सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता . पण सलामीजोडी स्वस्तात तंबूत परतल्याने इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली . चेन्नई कसोटीत संधी देण्यात आलेल्या इशांत शर्मा याने भारताला पहिले यश मिळवू दिले . शर्माने इंग्लंडच्या जेनिंग्स याला यष्टीरक्षक पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले . त्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याला स्लिपमध्ये झेलबाद केले होते . विराट कोहलीने स्लिपमध्ये कुकचा अप्रतिम झेल टीपला . सलामीचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रुट याने मैदानात जम बसवून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यास यश देखील आले . जो रुट याने मोईन अलीच्या साथीने तिसऱया विकेटसाठी शतकी भागीदारी रचली . उपहारापर्यंत इंग्लंडची सलामी जोडी तंबूत दाखल झाली असून केवळ ६८ धावा करता आल्या होत्या . दुसऱया सत्रात जो रुटने चांगली फलंदाजी केली . जो रुटने १० चौकारांच्या साथीने ८८ धावांची खेळी साकारली . पण जडेजाच्या गोलंदाजीवर स्विप शॉट खेळताना जो रुटच्या बॅटला कट लागून पार्थिव पटेलने झेल टीपल्याची अपील भारतीय संघाने केली होती . मात्र पंचांनी नकार दिला होता . मग भारतीय संघाने डीआरएस प्रणालीची मदत घेतली . डीआरएस पद्धतीनुसार तो बाद असल्याचे ठरविण्यात आले , पण पंचांच्या निर्णयावर जो रुटने यावेळी नाराजी व्यक्त केली . जो रुट बाद झाल्यानंतर मोईन अलीने धुरा सांभाळत मैदानात जम बसवला . दिवसाच्या तिसऱया सत्रात मोईन अलीने आपले शतक देखील पूर्ण केले . बेअरस्टोने मोईन अलीला चांगली साथ दिली . पण तो ४९ धावांवर जडेजाच्या फिरकीवर झेलबाद झाला . अशाप्रकारने निराशाजनक सुरूवातीनंतर इंग्लंडला दिवसाच्या अखेरीस ४ बाद २८४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारताल आली आहे . मोईन अली नाबाद १२० धावांवर , तर बेन स्टोक्स नाबाद ५ धावांवर खेळत आहेत . भारताकडून जडेजाने तीन , तर इशांत शर्माने एक विकेट घेतली . भारताने मालिका ३ - ० अशी खिशात घातली असली असून चेन्नई कसोटी जिंकून इंग्लंडला व्हॉईटवॉश देण्याचा भारताचा इरादा आहे . ‘वर्दा’ चक्रीवादळाच्या आव्हानाचा मुकाबला करणाऱ्या चेन्नई शहरात दाखल झालेल्या इंग्लंडच्या संघाने भारतीय वादळाचाच विलक्षण धसका घेतला आहे . मालिकेतील पाचवी आणि अखेरची कसोटी जिंकून भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे . या विजयानिशी भारत सलग १८व्या कसोटी सामन्यात अपराजित राहण्याची किमया साधू शकेल . cricket scores , India vs England : दिवसभरातील अपडेट्स | 2 |
गुगलने आपलं लोकप्रिय मेसेजिंग अॅप Allo बंद करण्याची घोषणा केली आहे . सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीने हे अॅप लाँच केलं होतं . मात्र अपेक्षेऐवढी लोकप्रियता या अॅपला न मिळाल्याने कंपनीने हे अॅप बंद करण्याची घोषणा केली आहे . मार्च 2019 पर्यंत Allo बंद होईल . या अॅपमुळे बरंच काही शिकायला मिळालं , असं गुगलने एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे . यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच कंपनीने या अॅपमध्ये गुंतवणक करणं बंद केलं होतं , याऐवजी इतर प्रोजेक्ट्सवर कंपनीने जास्त भर दिला होता . मध्यंतरी काही नवीन फिचर्स कंपनीने या अॅपसाठी आणले होते , मात्र तरीही व्हॉट्सअॅपशी टक्कर देण्याऐवढी याची लोकप्रियता या अॅपला कधीही मिळाली नाही . यामध्ये व्हिडीओ कॉलिंग फिचर दिलं नाहीये , याशिवाय फाइल शेअरिंग फिचरही देण्यात आलं नव्हतं . अॅलो अॅपद्वारे फोटो , लोकेशन आणि स्टिकर्स पाठवता येत होते मात्र , डॉक्युमेंट्स शेअर करता येत नव्हते . दुसरीकडे व्हॉट्स अॅपमध्ये ही सर्व फिचर्स बरीच लोकप्रिय आहेत . | 1 |
विम्बल्डन ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे . जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालला विम्बल्डनची हिरवळ तितकीशी मानवत नाही . मात्र तरीही त्याच्या नावावर विम्बल्डनची २ विजेतेपद जमा आहेत . नदालप्रमाणेच प्रत्येक टेनिसपटूला चाहत्यांच्या अनेक विचित्र मागण्यांना सामोरं जावं लागतं . सामना संपल्यानंतर आपल्या आवडत्या खेळाडूची सही घेण्यासाठी चाहते झुंबड करत असतात . नदालने आपल्या एका चाहत्याच्या चक्क शरिरावर ऑटोग्राफ दिली आहे . मात्र विम्बल्डनमधला आपला दुसरा सामना संपल्यानंतर नदालला चाहत्याच्या विचित्र मागणीला सामोरं जावं लागलं . अमेरिकेच्या डोनाल्ड यंगवर मात केल्यानंतर मैदानाबाहेर पडताना स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याने आपल्या कृत्रिम पायावर सही मागितली . नदालनेही फार आढेवेढे न घेता त्या चाहत्याच्या कृत्रिम पायावर सही केली . सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नदाल म्हणाला , ”मी मैदान सोडत असताना ‘तो’ आधीपासूनच आपला कृत्रिम पाय काढून माझ्या ऑटोग्राफची वाट बघत होता . त्यामुळे मी त्याला नकारही देऊ शकलो नाही . ” मात्र यापेक्षाही अनेक विचित्र मागण्यांना आपण सामोरे गेल्याचं नादालने कबूल केलं . यावरुन चाहत्यांचं खेळाडूंवर असलेल्या प्रेमाविषयी आपल्याला कल्पना येतच असेल . | 2 |
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याने सुरवात होईल . हा सामना ३० मे रोजी ओव्हलवर होईल . अंतिम सामना १४ जुलैस लॉर्डसवर खेळविण्यात येईल . ऑस्ट्रेलिया विजेतेपद टिकविण्याच्या मोहिमेस १ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरवात करेल . माजी विजेते पाकिस्तानची सलामी वेस्ट इंडिजसी ( ३१ मे २०१९ ) होईल . भारताचा पहिला सामना ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल . पारंपिरक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना १६ जून रोजी ओल्ड ट्रॅफर्डवर होईल . आफ्रिका ९ जून - वि . ऑस्ट्रेलिया १३ जून - वि . न्यूझीलंड १६ जून - वि . पाकिस्तान २२ जून - वि . अफगाणिस्तान २७ जून - वि . वेस्ट इंडीज ३० जून - वि . इंग्लंड २ जुलै - वि . बांगलादेश ६ जुलै - वि . श्रीलंका | 2 |
त्यांनी कथ्थक , भरतनाटय़म्चे प्रशिक्षण घेतले होते . नृत्याचे कार्यक्रमही त्या करत होत्या . सितारादेवी , गोपीकृष्ण , मंजुश्री बॅनर्जी , रोशनकुमारी यांच्याप्रमाणे त्यांना शास्त्रीय नृत्यांगना व्हायचे होते . पण नियतीने त्यांच्या बाबतीत काही वेगळेच योजिले होते . पुढे नृत्य सुटले ते सुटलेच . मराठी रंगभूमी व चित्रपटातून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले . सोज्वळ , शालीन चेहरा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे - नाईक आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत . नियती काही गोष्टी ठरवते आणि त्या तशाच घडतात . जे घडायचे ते घडते . नियतीवर त्यांचा विश्वासही आहे . नृत्याचे शिक्षण घेतले असल्याने केवळ नृत्याचे कार्यक्रम करायचे . रंगभूमी किंवा चित्रपटात काम करायचे नाही असे त्यांनी ठरविले होते . पण पुढे याच नियतीमुळे ‘अभिनय’ हाच त्यांचा श्वास बनला . आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या . त्यांचा जन्म गडहिंग्लजचा . वडील रामकृष्ण ऊर्फ रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते . शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली . आई , वडील , मोठा भाऊ , धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब . रत्नागिरी , पाली , भोर , पुणे , कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले . शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या . लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच . नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे ( भरतनाटय़म् , कथ्थक ) धडे घेतले . आठ - दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत . आईचे मामा आप्पासाहेब इनामदार ( अभिनेते प्रकाश इनामदार हे आशा काळे यांचे मामेभाऊ ) यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले . त्या वेळच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले , माझ्या वडिलांना ज्योतिषाचीही थोडी जाण होती . माझा जन्म अमावास्येचा आणि शनिवारचा . त्यामुळे आई , घरचे काही नातेवाईक आणि परिचित यांच्यात माझ्या भविष्याबाबत चर्चा व्हायची . वडिलांनी माझी पत्रिका मांडून ही कलाकार होणार असे भविष्य तर जोशी नावाच्या आमच्या परिचित विद्वान गृहस्थांनी ‘अमावास्येची पोर सर्वाहुनी थोर’ असे माझ्याबद्दल सांगितले होते . घरातील वातावरण बाळबोध असल्याने नाटक , चित्रपटात काम करणे हा दूरचाच भाग होता . पण म्हणतात ना नियती काही ठरविते आणि तसे घडते . माझ्याही बाबतीत तेच झाले . १९६२ मध्ये भारत - चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही . शांताराम , बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती . या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते . माझ्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय . पेंढारकर आमच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का ? असे विचारले . आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर मला नृत्य करायचे होते . आई - वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून मी काम केले . स्वतः बाबुराव पेंढारकर , बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते . माझे नृत्य झाले की मी विंगेत येऊन बसायचे आणि पुढचे नाटक पाहायचे . एका प्रयोगाच्या वेळी नाटकातील डोहाळजेवणाच्या प्रसंगात काम करणाऱ्या एक अभिनेत्री आल्या नाहीत . त्यामुळे ऐनवेळी केवळ गंमत म्हणून ते काम मी केले . त्यावेळी मी अवघी १४ / १५ वर्षांंची होते . त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले . माझ्यातील नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ( बाळ कोल्हटकर आणि बाबुराव पेंढारकर यांची भागीदारीतील ही संस्था होती ) ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली . पौगंडावस्थेतील नायिका मला त्यात साकारायची होती . माझ्यासाठी आणि आईसाठीही तो धक्काच होता . खरे तर मला नाटकात काम करायचे नव्हते . मुंबईला जाण्यापूर्वी मी आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात गेले आणि देवीला त्यांनी मला नापास करू दे . तुला खडीसाखर ठेवेन’ , असे साकडे घातले . पण देवीने आणि नियतीने वेगळेच ठरविले असावे . ‘सीमेवरून परत जा’ नाटकातील नायिकेच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली . व्यावसायिक रंगभूमीवरचे ते माझे पहिले नाटक . याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते . नाटकात माझ्या नृत्यकलेला वाव मिळावा म्हणून दोन गाणीही होती . या नाटकापासून माझा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला . पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक मिळाले आणि या नाटकाने मला ‘ताई’ अशी ओळख मिळाली . आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली . यात प्रामुख्याने ‘कलावैभव’ , ‘अभिजात’ , ‘नाटय़संपदा’ , ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे . ‘गहिरे रंग’ , ‘गुंतता हृदय हे’ , ‘घर श्रीमंतांचे’ , ‘देव दीनाघरी धावला’ , ‘लहानपण देगा देवा’ , ‘वर्षांव’ , ‘विषवृक्षाची छाया’ , ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके . ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५ , ‘गुंतता’चे ८७५ प्रयोग त्यांनी केले . रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला . भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट . ‘गनिमी कावा’ , ‘घर गंगेच्या काठी’ , ‘कैवारी’ , ‘हा खेळ सावल्यांचा’ , ‘सासुरवाशीण’ , ‘थोरली जाऊ’ , ‘ज्योतिबाचा नवस’ , ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ , ‘कुलस्वमिनी अंबाबाई’ , ‘चांदणे शिंपीत जाशी’ , ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’ , ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट . त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला . राज्य शासनाच्या व्ही . शांताराम , अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत . चित्रपट आणि नाटकांधील सोशीक , सहनशील मुलगी , सून , आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली . या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का ? यावर त्या म्हणाल्या , हो तसा प्रयत्न केला . ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’ , ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या . सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले . माझे कौतुक झाले . या भूमिकाही गाजल्या . वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक , सहनशील , सोज्वळ , सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या . अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही . जे घडायचे ते घडले . पण या सर्व भूमिका मी अक्षरशः जगले . त्या जिवंत केल्या . त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते . आई , ताई , मुलगी , सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे . माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे . नवरे , डॉ . काशिनाथ घाणेकर , वसंतराव जोगळेकर , विजया मेहता , सुलोचना दीदी आदी मान्यवरांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे . बाबुराव पेंढारकर यांच्यामुळे रंगभूमीवर आणि भालजी पेंढारकर यांच्यामुळे रुपेरी पडद्यावर माझा प्रवेश झाला . आशा काळे म्हणून मी आज जी काही आहे त्यात माझे सर्व दिग्दर्शक , लेखक , निर्माते , सहकलाकार आणि रसिक प्रेक्षकांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . ‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या , दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला . त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला , हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते . खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता . पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले . दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले . तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले , अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते . तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते . ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा , ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा . श , स , ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते . आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची . दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले . या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले . संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा िंकंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती . ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात , पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण , स्पष्ट उच्चार कर असे सांगायची . आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला . नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणाल्या , बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते . पुढे आणखी काही वर्षांनी त्यांच्याच मोठय़ा चिरंजीवांबरोबर माधव नाईक यांच्याबरोबर माझा विवाह होणार आहे , अशी तेव्हा कल्पनाही केली नव्हती . पण पुढे तसे झाले . लघुपट निर्माते - दिग्दर्शक माधव नाईक यांच्याबरोबर माझा विवाह झाला . म्हटले तर माझे लग्न उशिराच झाले . पण नाटय़ - चित्रपटातील यशस्वी प्रवासाप्रमाणेच माधवरावांसोबतचा माझा २५ वर्षांचा वैवाहिक जीवनाचा प्रवासही सुखाचा झाला . लग्नानंतरही त्यांच्यामुळेच मी नाटक - चित्रपटात काम करू शकले . माझे आई - वडील , भाऊ अनिल आणि पती माधवराव अशी माझी जीवाभावाची माणसे आज या जगात नाहीत . पण तितक्याच उत्कटतेने माझ्यावर प्रेम करणारी चांगली माणसे आजुबाजूला आहेत . रसिक प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करतात . माझ्यासाठी हा खूप मोठा ठेवा आहे . वयाच्या ६५ व्या वर्षांत असलेल्या आशाताईंना आजही चित्रपट , मालिका यात काम करण्यासाठी विचारणा होते . त्या सांगतात , गेली बावन्न वर्षे मी या क्षेत्रात काम केले . जे मिळाले त्यात मी समाधानी आणि तृप्त आहे . थोडेसे वेगळे काही करावे , त्याला वेळ देता यावा त्यासाठी विचारणा झाली तरी नम्रपणे नाही म्हणते . ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर मी सध्या आहे . वृद्धाश्रम , मूकबधिर , मतिमंद मुलांच्या शाळा येथे मी जाते . कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटते . सगळ्यांशी बोलते . त्या भेटीतून लोकांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहून मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे आहे . मला वाचनाचीही आवड असल्याने एकीकडे पुस्तकांचे वाचनही सुरू असते . या सगळ्यात खूप छान वेळ जातो . एक वेळ विष पचविणे सोपे आहे , पण यश पचविणे अवघड आहे . हे क्षेत्रच असे आहे की इथे जमिनीवरचे पाय हलतात . पण तू तुझे पाय कायम जमिनीवरच ठेव , असे माझी आई मला नेहमी सांगायची . आईचे ते वाक्य मी कायमचे मनावर कोरून ठेवले असल्याचे सांगत आशा काळे यांनी गप्पांचा समारोप केला . | 0 |
OnePlus 6T Launch Event : वनप्लस कंपनी OnePlus 6 ची पुढील आवृत्ती OnePlus 6T भारतामध्ये लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे . गेल्या काही दिवसांपासून OnePlus 6T या फ्लॅगशिप फोनबद्दल अनेक माहिती समोर आली आहे . टेलिकॉम क्षेत्रातील जाणकरांच्या माहितीप्रमाणे OnePlus 6T हा फोन भारतामध्ये १७ ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे . OnePlus 6T लाँचिंगची कार्यक्रम पत्रिका लीक झाली . चीनमधील सोशल मीडियावर OnePlus 6T ची लाँचिंग पत्रिका लीक झाली आहे . यामध्ये कंपनीने नवी टॅगलाईन “Unlock The Speed” चा वापर केला आहे . इन - डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरककडे “Unlock The Speed” चा कल दिसून येतोय . कंपीनीने यामध्ये काही अमुलाग्र बदल केल्याचे बोलले जात आहे . OnePlus 6T या फोनचे काही फोटोही समोर आले आहेत . त्यानुसार फोनच्या मागील बाजूला तीन सेंसर आहेत . हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप फोन आहे . समोर आलेल्या फोटोनुसार , या फोनला मागील बाजूला तीन कॅमेरा आहेत . वनप्लसद्वारा जारी केलेल्या टीजरनुसार , OnePlus 6Tमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक नसेल . हा फोन यूएसबी टाइप - सी ईअरफोनसोबत येईल . OnePlus 6Tमध्ये वनप्लस 6 सारखे स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे . याशिवाय फोनमध्ये अँड्रॉइडचे 9.0 चे व्हर्जन अशेल . या फोनची किंमत अंदाजे ४० हजार रूपये असण्याची शक्यता आहे . | 1 |
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला . बी - टाऊनमधल्या अनेक कलाकारांनी तिला आपआपल्या परिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . पण आलिया मात्र तिच्या कुटुंबात सहभागी होणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीत व्यग्र होती . आलियाने स्वतःसाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक मांजरीचे पिल्लू घेतले आहे . आलियाने पांढऱ्या रंगाच्या या मांजराच्या पिल्लासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत , कुटुंबातील नवीन सदस्य असा मेसेजही टाकला आहे . आलियाला पाळीव प्राणी फार आवडतात हे तर सर्वांनाच माहित आहे . त्यातही तिला मांजरींवर जास्त प्रेम आहे . आलियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला मांजरींचे फोटो अधिक दिसतील . सध्या आलिया तिच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे भलतीच खूश आहे . ‘बद्रीनाथ की . . ’ हा सिनेमा १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे . ‘उडता पंजाब’ आणि ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातील तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली होती . उडता पंजाबमध्ये आलियाने एका बिहारी मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती . या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता . याशिवाय आलिया , अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ड्रॅगन’ या सिनेमात रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे . ‘ड्रॅगन’ सिनेमाच्या चित्रिकरणानंतर आलिया झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे . यात आलियासोबत रणवीर सिंगची मुख्य भूमिका आहे . | 0 |
पुढच्या माणसाला ठेच लागली , की मागचा माणूस शहाणा होतो व काळजीपूर्वक तो पाऊल टाकतो , असे आपण नेहमी म्हणत असतो . मात्र , आपल्या देशातील बॉक्सिंग संघटकांना याचा विसर पडला असावा . बॉक्सिंग क्षेत्राचे उच्चाटन होण्याची वेळ आली तरी ते आपापसात ठोसेबाजी करीत आहेत . आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने अंतिम मुदत दिल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर नवीन संघटना स्थापन होत आहे . देशातील सर्व संघटकांनी मतभेद विसरून खेळाच्या हितासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे . बॉक्सिंग या खेळात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करण्याची भरपूर संधी उपलब्ध असते . पदके मिळविण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य आपल्या देशात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे . विजेंदरसिंग व मेरी कोम यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे . या दोन्ही खेळाडूंनी बॉक्सिंग संघटनेकडून फारशी मदत न घेता हे यश मिळविले आहे . विजेंदर याच्याकडे आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता निश्चित आहे . मात्र संघटनांमधील मतभेद व गलिच्छ राजकारणास वैतागूनच त्याने व्यावसायिक बॉक्सिंगचा रस्ता पकडला . मेरी कोम ही जगातील सर्वच क्रीडापटूंसाठी प्रेरणादायक खेळाडू मानली जाते . एकीकडे सांसारिक आघाडी सांभाळून तिने बॉक्सिंगचे करिअर केले आहे . दोन अपत्ये झाल्यानंतर तिने ऑलिम्पिक पदक मिळविले आहे . त्याखेरीज अनेक विश्वविजेतेपदे तिच्या नावावर आहेत . तिसरे अपत्य झाल्यानंतरही ती पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली आहे . आपल्या देशात मेरी कोम व विजेंदर यांच्यासारखेच कौशल्य असलेले अनेक खेळाडू आहेत , मात्र संघटनात्मक स्तरावर असलेले मतभेद व सत्तालोलुप वृत्तीमुळे या खेळाडूंचे कौशल्य मातीतच गाडले जात असते . राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत सर्वच स्तरांवर दोन - तीन संघटना कार्यरत आहेत . आपल्या देशात ‘एक खेळ एक संघटना’ हे तत्त्व सर्रासपणे पायदळी तुडविण्यात आले आहे . खेळाच्या व खेळाडूंच्या विकासापेक्षा स्वतःकडे आणि स्वतःच्या पाठीराख्यांकडे कशी सत्ता राहील याचाच विचार या संघटना करीत असतात . दुर्दैवाने भारतीय ऑलिम्पिक महासंघ व राज्य स्तरावरील संघटना आपण कोणत्या संघटनेस पाठिंबा द्यायचा याच्याच संभ्रमात पडलेल्या आढळतात . या संघटकांच्या गोंधळात खेळाडूंची मात्र ससेहोलपट होताना दिसते . आपण कोणत्या संघटनेकडे सदस्य व्हायचे , हा प्रश्न खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना नेहमीच पडत असतो . अंतर्गत कलह हा तर आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रास असलेला शापच आहे . बॉक्सिंग क्षेत्र त्याला अपवाद नाही . गेली अनेक वर्षे मोठय़ा प्रमाणावर भांडणे सुरू आहेत . मात्र २०१२ मध्ये त्याची तीव्रता एवढी वाढली की , आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतीय बॉक्सिंगवरच बंदीचा बडगा आणण्याचा इशारा दिला . २०१२ मध्ये राष्ट्रीय संघटनेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय महासंघाने त्या संघटनेची मान्यता काढून घेतली व नव्याने संघटना स्थापन करण्याचे आदेश दिले . त्यानंतर बऱ्याच मेहनतीने नवीन संघटना उभी राहिली ; तथापि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बंडाळीचे निशाण उभे राहिले . वैयक्तिक अहमहमिका हेच या बंडाळीमागचे कारण होते . सातत्याने चाललेली भांडणे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतात राष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यासाठी १४ मे ही मुदत दिली आहे . जर या मुदतीत नवीन संघटना कार्यरत झाली नाही तर भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली भाग घेता येणार नाही , असा इशाराच दिला आहे . या इशाऱ्यामुळे बॉक्सिंग संघटक खडबडून जागे झाले आहेत . केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन संघटना स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे . आता बॉक्सिंग संघटकांवर आपापसातील मतभेदांना मूठमाती देत सन्मानाने एकत्र काम करण्याची जबाबदारी आली आहे . जर खेळाडू असतील तरच संघटना आहे , हे तत्त्व त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे . मिलिंद ढमढेरे millind . dhamdhere @ expressindia . com | 2 |
क्रिकेट विश्वात हल्ली प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम रचले जातात , तर जुने विक्रम मोडले जातात . हल्ली ट्वेन्टी - २० क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे . तीन तासांत झटपट क्रिकेटचा रोमांचक आनंद देणारा हा प्रकार घड्याळाच्या काट्यावर धावणाऱया लोकांना सर्वार्थाने आपलासा वाटू लागला . कसोटी आणि एकदिवसीय सामन्याचा आनंद घेण्यासाठी जवळपास पूर्ण दिवसच द्यावा लागतो . पण ट्वेन्टी - २० मध्ये केवळ तीन तासांचा वेळ खर्ची होतो आणि त्यात चुरशीच्या लढतीचा रोमांच पाहायला मिळतो . एकाच दगडात दोन उद्देश साध्य होत असल्याने क्रिकेट रसिकांचा ओढा ट्वेन्टी - २०कडे वाढला . भारतीय संघाने मात्र क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपले वर्चस्व कायम राखले . महेंद्रसिंग धोनीने भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून दिले , तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी - २० मध्ये संघ अनुक्रमे तिसऱया व दुसऱया स्थानावर आहे . धोनीच्या भरवशाच्या फलंदाजीने भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत . भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीने क्रिकेटविश्वात एक फलंदाज म्हणून मॅच विनर अशी ओळख निर्माण केली . क्रमवारीत अनेकदा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊनही धोनीने केव्हाच दबावाखाली फलंदाजी केली नाही . ट्वेन्टी - २० करिअरमध्ये धोनीच्या नावावर तर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे . ट्वेन्टी - २० विश्वात गेल्या ११ वर्षात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही . धोनी ट्वेन्टी - २० क्रिकेटमध्ये याआधी २००६ साली द . आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता . यानंतर धोनीने एकूण ६४ ट्वेन्टी - २० सामने खेळले आणि यात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही . याशिवाय , ट्वेन्टी - २० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना धोनीने सर्वाधिक विकेट्स घेतल्याचाही पराक्रम केला आहे . धोनीने आजवर ६३ वेळा स्टम्पिंग केले आहे , यात ४१ झेल आणि २२ स्टम्पिंग्सचा समावेश आहे . | 2 |
अनेकदा नवोदित कलाकारांना सिनेमा किंवा मालिका मिळाल्यावर आपले करिअर आता सुरू झाले असेच वाटते . सिनेमा आणि मालिका करुनच आपण पैसा , प्रसिद्धी मिळवू शकतो आणि ती टिकवू शकतो असं वाटत असतं . किंबहुना तशीच काहीशी स्वप्नही त्यांना पडत असतात . पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी करावा लागणारं तपही तेवढंच महत्त्वपूर्ण असतं . मालिका आणि सिनेमे याने प्रसिद्धी जरी मिळत असली तरी स्वतःला समृद्ध करण्यासाठी रंगभूमीची नाळ जोडलेली असणं फार गरजेचं आहे . रंगभूमीशी असलेल्या आपल्या याच नात्याविषयी आज कथा पडद्यामागचीमध्ये आपल्यासोबत संवाद साधणार आहे अभिनेता आस्ताद काळे… नाटकांमध्ये रिटेक कधीच नसतात . तिकडे चुकांना वावच नसतो . पण म्हणून काही चुका होतच नाहीत , असे नाही . मात्र चुका झाल्यावर त्यातून कसे सावरायचे आणि पुढचे वाक्य , पुढचा प्रसंग कसा सांभाळून घ्यायचा याचे शिक्षण रंगभूमीवरच मिळते . पहिले काही प्रयोग हाऊसफुल्ल झाले म्हणून नंतरचे प्रयोग करायचे म्हणून करायचे असे चालत नाही . प्रत्येक प्रयोगाला येणारा प्रेक्षक वेगळा असतो . त्यामुळे पहिल्या प्रयोगावेळी तुमच्यात जी एनर्जी असते , तेवढीच एनर्जी तुम्हाला पुढच्या प्रत्येक प्रयोगावेळी द्यावी लागते . रंगभूमीवर तुम्ही दररोज नव्याने जगत असता . अभिनयात स्वतःचा पाया भक्कम करण्यासाठी रंगभूमी ही फार आवश्यक गोष्ट आहे . नाटकांमध्ये आव्हानेही खूप असतात . एखाद्या विनोदी नाटकात कोणत्या जागी लोकं हसणार हे अनेकदा माहित असते आणि तसे ते हसतातही . पण काही वेळा त्याजागी लाफ्टर न येता अनपेक्षित ठिकाणी लाफ्टर मिळून जातो . यावरूनच प्रयोगाच्यावेळी किती सर्तक राहावे लागते ते कळते . कोणतेही वाक्य तुम्ही सहज घेऊ शकत नाही . टीव्हीवर मात्र असे काही नसते . तुम्ही वाक्य चुकलात तरी रिटेकवर रिटेक घेता येतात . शिवाय सिनेमांमध्येही काहीसे तसेच आहे . सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आपल्याला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कळतात . पुण्यात प्रायोगिक रंगभूमी फार महत्त्वपूर्ण काम करते . दुर्दैवाने तसे काम मुंबईतील प्रायोगिक रंगभूमी करताना दिसत नाही . याला कारणेही वेगवेगळी आहेत . राधिका आपटे , अमेय वाघसारखे ताकदीचे कलाकार पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीमुळे मिळाले . आता त्यांचा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे . पण मुंबईमध्ये मात्र प्रायोगिक रंगभूमी मंदावलेली दिसते . सुरुवातीला कलाकारांना आविष्कारसारखे व्यासपीठ होते , पण आता तेही थंड पडल्याचे दिसून येते . दुसरीकडे मुंबईत इंग्रजी आणि हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात ; पण मराठीत मात्र फार काही होत नाही . शब्दांकन - मधुरा नेरुरकर madhura . nerurkar @ loksatta . com | 0 |
दहिसर क्राईम ब्रँच युनिट १२च्या पोलीस टीमने २००६ साली मुंबईशी काडीमात्र संबंध नसलेल्या हैदराबाद येथे घडलेल्या एका गुन्ह्याचा कसा छडा लावला ते तुम्हाला येत्या १३ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येणार आहे . त्याचप्रमाणे गुन्ह्यातील अनेक प्रकारांमधला एक प्रकार म्हणजे मिसींग केस . त्याचप्रमाणे आजवरच्या पोलिसी अभ्यासावरून पोलिसांनी हा निष्कर्ष काढलाय की बेपत्ता व्यक्ती ही कधी ना कधी जिवंत किंवा मृतावस्थेत सापडतेच . खारघर येथे राहणाऱ्या पन्नास वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत नेमकं असंच काहीसं घडलं … हसरा खेळकर जेरॉम दि . ३१ जानेवारी २००९ या दिवसानंतर अचानक बेपत्ता झाला . मिसिंग जेरॉमचं गूढ पनवेल क्राईम ब्रँचच्या युनीट २ ने कसं उकळून काढलं … त्याचा बुरखा फेडणारी ही धक्कादायक कथा तुम्हाला १४ जानेवारीला रात्री ९ वाजता पाहता येईल . सन २००६ मध्ये हैदराबाद मधील आलुकास ज्वेलरी शॉप मध्ये मोठी चोरी झाली . संपूर्ण भारतभर त्याची चर्चा सुरु होती . चोरीची स्टाईल मुंबईतील दहिसर पोलिसांना ओळखीची वाटली . विनोद नावाच्या मुंबईतील तडीपार गुंड , ज्याने मुंबईमध्ये अश्या प्रकारच्या चोऱ्या केल्या होत्या . पोलिसांना त्याचा संशय आला . पोलीस अधिकारी सुनील दरेकर यांनी त्यांच्या माणसांना कामाला लावले . गुन्हा घडला होता हैदराबाद मध्ये , ज्याचा मुंबई पोलिसांचा काहीही संबंध नव्हता . पण गुन्हा हा गुन्हा असतो आणि पोलिसांची त्यावर व्यवस्थित नजर असतेच . कोणताही पुरावा नसताना एका अंदाजावर सुरु झालेला हा तपास मुंबई पोलिसांना खऱ्या गुन्हेगारापर्यंत घेऊन गेला आणि कश्या प्रकारे त्यांनी हैदराबादमध्ये झालेल्या चोरीतील गुन्हेगाराला सापळा रचून मुंबईच्या एका बारमध्ये पकडले आणि सर्व माल कसा ताब्यात घेतला हे तुम्हाला शुक्रवारच्या भागात पहायला मिळेल . सन २००९ , जेरॉम सलढाणा नावाची व्यक्ती अचानक गायब झाली . जेरॉम हा अतिशय हसरा खेळकर रिटायर्ड धनाढ्य व्यक्ती होता . त्याला मुंबईतील प्रॉपर्टी विकून गोव्याला सेटल व्हायचं होत . आणि अचानक ती व्यक्ती गायब झाली . पनवेल क्राईम ब्रँचच्या युनीट २ चे संतोष धनवडे यांच्याकडे ही केस आली . त्यांनी शोधकार्य हात घेतले . पहिलाच क्लू जेरॉमची स्कोडा गाडी मिळाली पण जेरॉम गायब होता . गाडीच्या स्टिअरिंगवर आणखी एका माणसाचे ठसे सुद्धा मिळाले . पण नक्की काय झालं हे कळत नव्हते . हे शोधकार्य सुरु असतानाच जेरॉमच्या भावाच्या ई मेल आयडीवर शाह नावाच्या व्यक्तीचा ई मेल येतो की त्याने जेरॉमची प्रॉपर्टी १ . ५० कोटीला विकत घेतली आहे . पोलिसांच्या दृष्टीने हे सगळं विचित्र होतं . ते शाह नावाच्या व्यक्तीच्या तपासाला लागतात . तपास करता करता पोलीस शाहपर्यंत कसे पोहचतात आणि जेरॉमच्या खुनाचा प्लॅन कसा सोडवला जातो याची चित्तरकथा येत्या शनिवारी पाहायला मिळेल . या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा , तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे , कलादिग्दर्शक विवेक देशपांडे , छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे . | 0 |
स्टेडियमवर जाऊन " याची देही याची डोळा ' एखादा सामना पाहणे ही एक अनुभूती असते . ऑस्ट्रेलियाच्या एका मुलाला अशीच अनुभूती झाली आणि प्रेरित होऊन त्याने थेट विश्वकरंडकापर्यंत मजल मारली . ऑस्ट्रेलियन संघातील जॅक्सन आयर्विन याची यशोगाथा अशीच आहे . जॅक्सन 12 वर्षांचा असताना सिडनीतील विश्वकरंडक पात्रता सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेला . ऑस्ट्रेलियाने पहिल्या विश्वविजेत्या उरुवेला हरवून 32 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर विश्वकरंडक पात्रता साध्य केली . 2006 च्या स्पर्धेला " सॉकेरूज ' पात्र ठरल्यानंतर एकच जल्लोष झाला . त्यात सहभागी झालेल्या जॅक्सनसाठी मग फुटबॉल हाच श्वास अन् ध्यास बनला . वयाच्या 25व्या वर्षी त्याचा विश्वकरंडक संघात समावेश झाला . मेलबर्नमध्ये जन्मलेल्या जॅक्सनने सेल्टिक ऍकॅडमीत खेळाचा श्रीगणेशा केला . त्याचे वडील स्कॉटलंडचे आहेत . त्यामुळे तो " यूएफा ' युवा ( 19 वर्षांखालील ) स्पर्धेत त्याने स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व केले , पण त्याची पहिली पसंती ऑस्ट्रेलियालाच होती . 2012 मध्ये त्याने 20 वर्षांखालील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले . मग पुढच्याच वर्षी त्याने वरिष्ठ पातळीवर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले . तो इंग्लिश साखळीतही खेळतो . 2017 - 18 मध्ये तो द्वितीय श्रेणी साखळीत बरटॉन अल्बिऑनकडून खेळला . त्यानंतर हल सिटीने 25 लाख डॉलरचा करार त्याच्याशी केला . जिगरी दोस्तही संघात ! ऑस्ट्रेलियन संघात जेमी मॅक्लारेन नावाचा खेळाडू आहे . तो आणि जॅक्सन खास मित्र आहेत . लहानपणापासून ते विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पाहायचे . प्रशिक्षक बर्ट वॅन मार्विक यांनी निवडलेल्या 26 जणांच्या प्राथमिक संघात जेमीची निवड झाली नव्हती . त्यामुळे तो दुबईला सहलीसाठी गेला होता . दरम्यानच्या काळात टॉमी ज्युरीचला दुखापत झाली . त्यामुळे जेमीला पाचारण करण्यात आले . दुबई सहलीसाठी जेमीने नवे बूट खरेदी केले होते . " कॉल ' येताच त्याने " स्टड्स ' चढविले आणि तो सज्ज झाला . | 2 |
लोकप्रिय फोटो - मेसेजिंग अॅप इन्स्टाग्रामने अनेक दिवसांच्या पडताळणीनंतर आपल्या सर्व युजर्सना अकाउंट व्हेरिफायचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे . आता कोणताही इन्स्टाग्राम युजर आपल्या अकाउंटला ‘ब्ल्यू टिक’सह व्हेरिफाय करु शकतो . विशेष म्हणजे तुम्ही इन्स्टाग्राम अॅपवरुनच अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करु शकतात . तर जाणून घेऊया इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय कसं करायचं – इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफिकेशनचा पर्याय सध्या केवळ आयओएस युजर्ससाठी सुरू करण्यात आला आहे . जर तुम्ही अॅन्ड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल . जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटला व्हेरिफाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमचं अॅप अपडेट करा . यानंतर अकाउंटच्या सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला Request Verification चा पर्याय मिळेल . त्यानंतर तुम्हाला इन्स्टाग्राम आयडी , नाव आणि फोटोसह एक ओळखपत्र मागितलं जाईल . त्यानंतर इन्स्टाग्रामकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला कन्फर्मेशनचा ई - मेल मिळेल . इन्स्टाग्राम ब्ल्यू टिकची सुरूवात ऑस्ट्रेलियातून झाल्याचं सांगितलं जातं . सर्वात आधी कंपनीने ऑस्ट्रेलियातच याची चाचणी घेतली होती . चाचणीदरम्यान पारदर्शकता आणि फेक अकाउंट्स रोखण्यासाठी हा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचं इन्स्टाग्रामने सांगितलं होतं . | 1 |
भारतात २००५ ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील १० लाख मुलांचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे . न्यूमोनिया , अतिसार , धनुर्वात , गोवर यांसारख्या रोगांवर मात करण्याने हा फरक दिसून आला , असे लँसेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे . भारतात १ ते ५९ महिन्यांच्या मुलांमध्ये मृत्युदर कमी होण्याची आवश्यकता आहे . त्यामुळे बालमृत्युदर आणखी पाच टक्क्यांनी कमी होऊन त्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेले उद्दिष्ट साध्य होईल . २०३० पर्यंत बालमृत्यूचे प्रमाण हजारात २५ इतके खाली आणण्याचे संयुक्त राष्ट्रांनी दिलेले उद्दिष्ट आहे . २००० ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील २९ दशलक्ष मुले विविध कारणांनी भारतात मरण पावली , असे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीत दिसून आले आहे . पण बालमृत्युदर वाढण्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून आले आहे . तो दर जर कायम राहिला असता तर या काळात ३० दशलक्ष मुले मरण पावली असती , पण तसे झालेले नाही , असे या संशोधनाचे लेखक डॉ . प्रभात झा यांनी म्हटले आहे . गोवर लसीचा दुसरा डोस , सरकारच्या गर्भवती महिलांसाठीच्या योजना यांचा चांगला परिणाम झाल्यामुळे हा फरक दिसला आहे . १ ते ५९ महिने वयाच्या मुलांमध्ये हिवतापाने मृत्यू पावण्याचा दर अजून कमी झालेला नाही . नवजात बालकांच्या मृत्यूचा दर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दुप्पटच असून कमी वजनाची बालके जन्माला येण्याने ग्रामीण भागात जास्त मृत्यू होतात . मुलगा व मुलगी यांच्यातील बालमृत्युदरातील तफावतही कमी होत चालली आहे . | 1 |
धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे . ज्या वेळी आधुनिक शस्त्रे उपलब्ध नव्हती , त्या वेळी अनेक युद्धांमध्ये सवरेत्कृष्ट धनुर्धाऱ्यांचाच विजय होत असे . भारतीय संस्कृतीमधील रामायण - महाभारतामधील युद्धे धनुर्विद्येवरच आधारित होती . असे असूनही या क्रीडा प्रकारात भारताला एकही ऑलिम्पिक पदक मिळवता आलेले नाही . ऑलिम्पिक पदकांचा ध्यास ठेवत येथील ‘आर्चर्स अकादमी ऑफ एक्सलन्स’ ही संस्था या खेळाचा तळागाळापासून विकास करण्यासाठी कार्यरत आहे . क्रिकेट , फुटबॉल , टेनिस आदी लोकप्रिय खेळांच्या झगमगाटापुढे धनुर्विद्या हा क्रीडाप्रकार अपेक्षेइतका लोकांच्या मनावर प्रभाव पाडू शकलेला नाही . एखादा िलबाराम आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये चमक दाखवीत ऑलिम्पिकपर्यंत झेप घेतो , तेव्हा त्याचा खेळ कोणता आहे , याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते . जेव्हा त्याचा खेळ कळतो , तेव्हा अरे हा तर आपला प्राचीन खेळ असल्याची जाणीव लोकांना होते . मात्र या खेळासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी मात्र फारसे हात पुढे येत नाही . त्यामुळेच या खेळाची संस्था चालवणे म्हणजे पदरमोड करीतच विकासाचे कार्य करण्याखेरीज संघटकांपुढे अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसतो . आर्चर्स अकादमीलाही मैदान मिळण्यापासून सर्वच गोष्टींबाबत संघर्ष करावा लागला आहे . या खेळाच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या रणजित चामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली १६ वर्षे अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत . धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील विविध अंतरांच्या स्पर्धासाठी साधारणपणे फुटबॉल किंवा क्रिकेटच्या मैदानाच्या निम्मे आकाराचे मैदान आवश्यक असते . लहान जागेत १० मीटर , २५ मीटर , ५० मीटर आदी अंतराच्या स्पर्धाचा सराव करता येत असला , तरीही जेवढे मैदान मोठे असेल , तेवढा या खेळाचा सराव अधिक चांगला करता येतो . त्यामुळेच मोठे मैदान मिळवण्यासाठी आर्चर्स अकादमीला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे . सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन , विखे - पाटील प्रशाला आदी संस्थांमध्ये या अकादमीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली . सुरुवातीला १० - १२ खेळाडूंची संख्या आता तीन आकडी झाली आहे . केवळ पुण्यातील नव्हे , तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून या अकादमीत खेळाडू प्रशिक्षणासाठी येत असतात . अधूनमधून अन्य राज्यांमधूनही या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक खेळाडू येतात , हीच या अकादमीच्या कार्याची पावती आहे . कटारिया प्रशाला , महावीर प्रशाला , दिल्ली पब्लिक स्कूल , गंगाधाम सोसायटीसमोरील मोकळी जागा , पोद्दार इंटरनॅशनल स्कूल , शाहू विद्यामंदिर महाविद्यालय , महेश बालभवन आदी ठिकाणी या अकादमीतर्फे खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . या अकादमीतून प्रशिक्षण घेणारे प्रवीण जाधव , तन्मय मालुसरे , भाग्यश्री कोलते यांची आगामी ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण शिबिराकरिता निवड झाली आहे . या खेळाडूंप्रमाणेच स्वप्निल ढमढेरे , मेघा अगरवाल , पूर्वा पल्लिवाल , साक्षी शितोळे आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे . राष्ट्रीय स्तरावरील शिबिराकरिता या अकादमीतील १५हून अधिक खेळाडूंची निवड झाली आहे . राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र संघातील ७० टक्के खेळाडू या अकादमीतून तयार झालेले असतात . अमोल बोरिवले , आदिल अन्सारी , श्रीनिवास आदी अपंग खेळाडूंनाही या अकादमीत प्रशिक्षण मिळाले आहे . पुणे शहराबरोबरच राज्यात अन्यत्रही या अकादमीचे प्रशिक्षक नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत . नवोदित खेळाडू , हौशी खेळाडू व व्यावसायिक अशा विविध स्वरूपाद्वारे प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असते . अलीकडेच नऊ वर्षांखालील खेळाडूंकरिता स्पर्धा सुरू करण्यात आल्यामुळे सहा वर्षांपासूनची मुले - मुली या खेळाकडे येऊ लागली आहेत . या अकादमीतून तयार झालेल्या काही खेळाडूंना विविध उद्योगसंस्थांकडून थोडय़ा फार प्रमाणात आर्थिक मदत मिळू लागली आहे . तीन - चार खेळाडूंना ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट , लक्ष्य फाउंडेशन आदी संस्थांनी दत्तकही घेतले आहे . शालेय व महाविद्यालयीन स्तरावर या खेळाची व्याप्ती वाढावी , या दृष्टीने वासंतिक शिबिरेही या अकादमीतर्फे घेतली जात असतात . त्यामधूनच त्यांना चांगले नैपुण्य मिळत आहे . असे असूनही अकादमीकरिता स्वतःच्या हक्काची जागा मिळत नाही , तोपर्यंत या अकादमीच्या संघटकांवर सतत टांगती तलवार असते . महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी जागा मिळाली , तर या अकादमीतील खेळाडू निश्चितपणे ऑलिम्पिक पदकावर नाव कोरतील . | 2 |
रणबीर आणि कतरिना येत्या काळात ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . या दोन्ही कलाकारांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही . एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर आणि कॅट आता मात्र या नात्यातून वेगळे झाले असून फक्त आणि फक्त एकमेकांचे सहकलाकार म्हणून वावरताना दिसतात . त्यांच्या ब्रेकअप विषयीसुद्धा या दोघांनीही बोलणं टाळलं . जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि कतरिनाने हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला . सुरुवातीच्या काळात ब्रेकअपमुळे त्यांच्यात कमालीचा दुरावा पाहायला मिळाला . पण , आता मात्र ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने दोघंही एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत आहेत . प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत . अशाच एका मुलाखतीदरम्यान रणबीरने त्याच्या आयुष्यातील कतरिनाचं नेमकं स्थान आहे तरी काय , यावरुन पडदा उचलला . त्यांच्या नात्याची वेगळीच बाजू रणबीरच्या वक्तव्यातून पहायला मिळाली . ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटानंतर कतरिनासोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे . चित्रपट हे एक महागडं माध्यम आहे . इथे अनेकांचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो . त्यातही बरेच लोक तुमच्यावर अवलंबून असतात . माझ्या आणि कतरिनाच्या नात्याविषयी आजवर माध्यमांमध्ये जे काही सांगण्यात आलं , जे काही अंदाज बांधण्यात आले ते नेहमीच सकारात्मक होते . माझ्या आयुष्यात तिचं स्थान महत्त्वाचं आहे . ती मला माझ्या आयुष्यात हवीये , मला तिची आजही गरज आहे . कारण , आजवरच्या प्रवासात तिच्यासोबत असण्याचा बराच प्रभाव माझ्यावर पाहायला मिळाला आहे आणि हे असंच सुरू राहिल’ , असं रणबीरने स्पष्ट केलं . वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती यावेळी त्याने चित्रपटातील भूमिकेविषयीसुद्धा बरीच माहिती दिली . ‘या चित्रपटासाठी तिनेही बरीच मेहनत घेतली आहे . त्यामुळे माझ्या इतकीच तिची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची आहे . तिच्यासोबतचं माझं नातं , आमची पार्टनरशिप या साऱ्याबद्दल मी तिचे आभार मानतो’ , असं रणबीर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला . दरम्यान , ‘सावरिया’ रणबीर सध्या दिल्लीस्थित एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे . चित्रपटसृष्टीशी तिचा काहीच संबंध नसून आता हे नातं कधी सर्वांसमोर येतंय याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे . वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं… | 0 |
दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे . आपल्या कामात ती कितीही व्यस्त असली तरी स्वतःसाठी वेळ काढायला ती विसरत नाही . शॉपिंगला जाणं , चांगल्या ठिकाणी जेवायला जाणं यातून ती स्वतःला वेळ देते . तिची नवीन जाहिरात पाहून हे तर अजूनच स्पष्ट होतं . या जाहिरातीत दिसणाऱ्या तिच्या मोहक हास्यावरून नजरच हटत नाही . या जाहिरातीची प्रत्येक फ्रेम तिचं सौंदर्य अधिकच खुलवते . कमीत कमी मेकअपमध्ये खुलणारं तिचं सौंदर्य अजूनच लक्ष वेधून घेतं . राजकारणामुळे फवाद खानचा बळी गेला - रणबीर कपूर जवळपास १८ प्रॉडक्टची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असणाऱ्या दीपिकाने नुकतेच अॅक्सिस बँकेसाठी एका जाहिरातीचं चित्रीकरण केलं . न्यू - यॉर्कमधील नावाजलेले दिग्दर्शक आणि छायाचित्रकार डीन फ्रीमॅन यांनी या जाहिरातीचे चित्रीकरण केले आहे . बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडच्या मस्तानीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला . सौंदर्य प्रसाधनांपासून एअर लाइन्सपर्यंत आणि मोबाइल फोनपर्यंत सर्वच मोठ्या कंपन्यांची दीपिका ब्रॅण्ड अँम्बेसिडर आहे . आपल्या हरहुन्नरी अभिनयाने तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडकरांची मनं तर जिंकलीच आहेत . शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही तिने अधिराज्य गाजवलं आहे . काही महिन्यांपूर्वी तिचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता . याशिवाय ‘फोर्ब्स’च्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिच्या नावाचा समावेश होता . ३१ वर्षीय दीपिका ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमानंतर लवकरच ‘पद्मावती’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . तिचा अजून एक हॉलिवूडपट येणार असल्याची चर्चाही सिनेवर्तुळात रंगत आहे . Priyanka Chopra : बॉलिवूडच्या देसी गर्लचा आजवरचा प्रवास | 0 |
महिला आशिया ट्वेन्टी - २० कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आशियाई ट्वेन्टी - २० क्रिकेट स्पध्रेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्स आणि चार चेंडू राखून विजय मिळवला . भारताने १९ . २ षटकांत ५ बळींच्या मोबदल्यात ९८ धावांचे लक्ष्य पार केले . कौरने दोन बळी टिपले , तर २२ चेंडूंत २६ धावांचे योगदानही दिले . भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला . एकता बिस्त आणि अनुजा पाटील यांनी पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना झटपट बाद केले . त्यानंतर पाकिस्तानच्या आयेशा जाफर व नैन अबिदी यांनी संयमी खेळ करताना संघाला निर्णायक २० षटकांत ७ बाद ९७ धावांपर्यंत मजल मारून दिली . या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचीही दैना उडाली , परंतु मिताली राज व कौर यांनी संघाचा विजय निश्चित केला . सीमेवरील चाललेल्या तणावामुळे उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळणार की नाही , याबाबत तणावाचे वातावरण होते . मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे ( आयसीसी ) ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने भारतीय संघाने खेळण्यास हिरवा कंदील दिला . संक्षिप्त धावफलक पाकिस्तान : ७ बाद ९७ ( आयेशा जाफर २८ , नैन अबिदी नाबाद ३७ ; एकता बिस्त ३ - २० , हरमनप्रीत कौर २ - १६ ) पराभूत वि . भारत : ५ बाद ९८ ( मिताली राज ३६ , हरमनप्रीत कौर नाबाद २६ ; निदा दार २ - ११ ) . | 2 |
नवी दिल्ली : उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोनच दिवसांनी आज ( मंगळवार ) दुपारी पाकिस्तानच्या लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेवर पुन्हा गोळीबार केला . पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांच्या ठाण्यांना लक्ष्य केले . या गोळीबारामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही . दुपारी 1.10 ते 1.30 या कालावधीमध्ये हा गोळीबार झाला . उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे . त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा ही आगळीक केली आहे . या गोळीबाराचे अधिक तपशील अद्याप हाती आलेले नाहीत . रविवारी उरीत झालेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले . या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे . | 2 |
End of preview. Expand
in Dataset Viewer.
README.md exists but content is empty.
- Downloads last month
- 32